loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत उमराठने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला बचत गटांना दिले अळिंबी उत्पादन प्रशिक्षण

वेळणेश्वर - गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथे सोमवार दि. १२.१.२०२६ रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत बचत गटांना धिंगरी अळिंबी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून व दिप प्रज्वलित करून जयंती साजरी करण्यात आली. सर्व उपस्थित बचत गटाच्या महिलांनी सुद्धा या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे भाऊ यांनी महापुरुषांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची माहिती दिली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच तरुणांनी /युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपले गाव समृद्ध करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यानंतर सर्व बचत गटांतील महिला स्वावलंबी आणि सक्षम व्हाव्यात यासाठी धिंगरी अळिंबी उत्पादन कसे करावे याचे खास मार्गदर्शन करण्यासाठी आलेले नलावडे मशरुम फार्मचे मालक श्रृषिकेश नलावडे व गौरव नलावडे यांनी पिपीटी प्रोजेक्ट दाखवून सखोल मार्गदर्शन आणि उत्पादन कसे करावे या बाबतीत प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले. शिवाय अळिंबी/मशरूम हे शाकाहारी आहे की मांसाहारी ? अशा प्रकारचे अळिंबी विषयी असलेले समज व गैरसमज, काय खरे आणि काय खोटे, मार्केटिंग व रणनिती, कृषी व शेती विज्ञान आणि माहिती या बाबतीत सुद्धा उत्तम मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

सदर अळिंबी प्रशिक्षण घेण्यासाठी बचत गटाच्या सुमारे ६०/७० महिला उपस्थित होत्या. आयोजित केलेले अळिंबी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, संगणक परिचालक साईस दवंडे आणि बचत गटांच्या सीआरपी श्रृती कदम आणि इतर महिलांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg