loader
Breaking News
Breaking News
Foto

विवेकानंद केंद्र, कोकण विभाग आयोजित 'युवा नेतृत्व विकसन शिबिर' सावर्डे येथे उत्साहात

संगमेश्वर (प्रतिनिधी) : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, कोकण विभाग (महाराष्ट्र प्रांत) आयोजित पाच दिवसीय निवासी 'युवा नेतृत्व विकसन शिबिर' नुकतेच एस.पी. कृषी महाविद्यालय, दहिवली-सावर्डे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक २६ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या शिबिरात देवरुखसह गोवा, दादर, पार्ले-अंधेरी, डोंबिवली आणि बदलापूर अशा विविध नगरांमधील १११ युवकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ८० शिबिरार्थी आणि ३१ कार्यकर्त्यांचा समावेश होता. युवकांचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्र उभारणीसाठी सक्षम नेतृत्व घडवणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. शिबिराचे उद्घाटन चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि आ. सुजाताताई दळवी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना मान्यवरांनी युवकांना स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकारून समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिराची दिनचर्या युवकांच्या पंचकोषीय विकासाला (शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक) केंद्रस्थानी ठेवून आखण्यात आली होती. शिबिरार्थींची 'सुजलाम्', 'सुफलाम्', 'बहुबलधारिणी' अशा ८ विविध गणांत विभागणी करण्यात आली होती. बौद्धिक सत्रांमध्ये मृणाल ताई यांनी 'आतल्या नेतृत्वाला जागे करा' (Be the leader within), गणेश यांनी 'सामर्थ्य हेच जीवन' आणि वल्लभ दादा यांनी 'सफलता ते सार्थकता' या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच 'शिवाजी महाराज - शेर शिवा का छावा' या विषयावर आ. पेंडसे यांचे विशेष सत्र अत्यंत प्रेरणादायी ठरले. याशिवाय आ. मंदार ओक आणि आ. सुमित व डॉ मृणाल ताई सराफ यांची घेतलेली प्रकट मुलाखत युवकांसाठी दिशादर्शक ठरली.

टाइम्स स्पेशल

शिबिरात १०८ सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञ, श्रमसंस्कार, भारतमाता पूजन, भजन संध्या आणि नियुद्ध (स्वसंरक्षण) यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या शेवटी युवकांनी नियमित सूर्यनमस्कार, स्वाध्याय, आणि आपापल्या परिसरात संस्कार वर्ग व केंद्र वर्ग सुरू करण्याचे संकल्प केले. शिबिराचा समारोप आ. सुमित यांच्या मार्गदर्शनाने झाला. या ५ दिवसांच्या निवासी शिबिरातून ऊर्जा घेऊन सर्व युवक आपापल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रकार्यासाठी सज्ज झाले आहेत, अशी भावना शिबिर प्रमुख प्रजय वझे यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

देवरुखच्या युवकांचाही लक्षणीय सहभाग

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg