loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले-पारगड रस्त्याच्या कामासाठी २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

तिलारी (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोर्ले-पारगड राज्य मार्ग १८७ च्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी आता दोडामार्ग आणि चंदगड तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले असून, येत्या २६ जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोडामार्ग कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सीताराम नाईक आणि रघुवीर खंडोजी शेलार, दीपक जाधव यांनी यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर २४ जानेवारी २०२६ पर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही, तर प्रजासत्ताक दिनी लोकशाही मार्गाने हे आंदोलन छेडले जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्ले-पारगड हा रस्ता केवळ स्थानिक वाहतुकीसाठीच नव्हे, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. ऐतिहासिक किल्ले पारगडकडे जाणार्‍या या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या २० वर्षांपासून या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात असून, आतापर्यंत ३५ वेळा आमरण उपोषणे करूनही केवळ आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही.

टाईम्स स्पेशल

या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही पाठवण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत काम सुरू न झाल्यास होणार्‍या आंदोलनाची आणि त्यातून उद्भवणार्‍या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg