loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण लायन्स क्लबकडून अंध-अपंग बांधवांसाठी अन्नदान सेवा उपक्रम

मालवण (प्रतिनिधी) - अंध अपंग बांधवांसाठी दैनंदिन जीवनातील कामकाजात आत्मनिर्भरता निर्माण करण्याच्या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने आयोजित कार्यशाळे दरम्यान मालवण लायन्स क्लब तर्फे अन्नदान सेवा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अन्नदान सेवाकार्यासाठी लायन्स क्लबच्या सदस्या फेनी फर्नांडीस यांनी निधी उपलब्ध करून दिला. या उपक्रमाबाबत अंध अपंग बांधव व आयोजकांकडून लायन्स क्लबचे आभार मानण्यात आले. यावेळी मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, खजिनदार पूनम चव्हाण, फॅनी फर्नांडीस, अंजली आचरेकर, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, उमेश शिरोडकर तसेच माजी नगरसेविका सुनीता जाधव, सामाजिक कार्यकर्ते दादा वेंगुर्लेकर आदी व इतर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg