loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात प्रथमच गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आगमन

महाड - जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुदेव यांचे कोकणात प्रथमच आगमन होत असून, त्या पार्श्वभूमीवर २१ जानेवारी रोजी महाड शहरात ‘कोकण अमृतसंध्या’ महासत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महासत्संग चिचकर ग्राऊंड, दस्तुरीनाका ते नातेखिंड रोडलगत, गांधारी नदीच्या तीरावर, करंजखोल, महाड,जि. रायगड येथे सायंकाळी सहा वाजता होणार असून, कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महासत्संगास स्थानिक आमदार तथा राज्याचे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री चंद्रकांत पाटील,तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कुलगुरू कर्नल काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून १२ ते १५ हजार अनुयायी व प्रशिक्षणार्थी उपस्थित राहतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सुमारे १६ हजार आसनांची व्यवस्था करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

हा महासत्संग आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र राज्य आणि महाड विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमासाठी १३ शिक्षक व सुमारे ६० स्वयंसेवक सेवा देणार आहेत. उपस्थितांसाठी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, पोलीस प्रशासन सज्ज असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले. महासत्संगात ध्यान, सत्संग व सुदर्शन क्रियेच्या महत्त्वावर भर देण्यात येणार आहे. सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून तणाव कमी होणे, मानसिक शांतता मिळणे व जीवनात सकारात्मकता वाढण्यास मदत होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. धर्म, जात, पंथ वा वयभेद न करता हा महासत्संग सर्वांसाठी खुला असून, महाडसह कोकणातील व राज्यातील नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg