loader
Breaking News
Breaking News
Foto

बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेलच्या रिचर्ड कुरांगती, लिओना कुरांगती या विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मोडून चमकदार कामगिरी

आबलोली (संदेश कदम) - बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल रत्नागिरीच्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी रिचर्ड विन्सेंट कुरांगती या विद्यार्थ्याने १-५० वर्ग पठणात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मोडून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे, उल्लेखनीय कामगिरी त्याने ४३.६० सेकंदात आश्चर्यकारकपणे पूर्ण केली आहे. बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल रत्नागिरीच्या इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी लिओना पॅट्रिक कुरांगती हिने फक्त १ मिनिट ३८ सेकंदात १९५ देशांच्या राजधान्यांचे अचूक पठण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मोडले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केल्याची घोषणा करताना आम्हाला तितकाच अभिमान वाटतो अशी माहिती आमाच्या प्रतिनिधीला शिक्षकांनी दिली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रसारित झाले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना अभिनंदनचा वर्षाव होत असून वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg