loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सतिश चिकणे

खेड (दिलीप देवळेकर) : खेड नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेला वेग आला असून शिवसेना पक्षाचे अनुभवी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी अधिकृतरीत्या नामनिर्देशन पत्र दाखल केले. विशेष म्हणजे, खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने 21-0 असा अभूतपूर्व विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. या एकहाती सत्तेमुळे उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराची निवड सहज आणि बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या वेळी नगरपरिषद परिसरात मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने कोणत्याही प्रकारची स्पर्धा दिसून आली नाही. त्यामुळे सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची उपनगराध्यक्षपदी निवड आता केवळ औपचारिकता राहिली असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. नामनिर्देशन दाखल करताना नगराध्यक्षा माधवी बुटाला, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण नगरपरिषदेत शिवसेनेची एकजूट आणि संघटनशक्ती स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते, संजय मोदी, मिनार चिखले यांच्यासह अनेक शिवसैनिक हजर होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पप्पू चिकणे हे खेड नगरपरिषदेतील लोकप्रिय आणि अनुभवी नेते मानले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध विकासकामांमध्ये पुढाकार घेत नगरपरिषद प्रशासनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शांत स्वभाव, प्रभावी समन्वयक क्षमता आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन या गुणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली छाप आहे. उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्या हाती आल्यावर खेड शहरातील प्रलंबित कामांना गती मिळेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. 21-0 या महायुतीच्या ऐतिहासिक विजयामुळे खेड नगरपरिषदेतील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली असून विपक्षाचा आवाज गायब झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामांबाबत निर्णय प्रक्रियेला अडथळ्याविना गती मिळण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, रस्ते तसेच शहरातील अनेक प्रलंबित महत्वाच्या विषय लवकरच पूर्णत्वास जातील अशी चर्चा शहरात सुरू आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा गुरुवारी दुपारी 2.30 होणार आहे. मात्र सर्व राजकीय परिस्थिती पाहता सतीश उर्फ पप्पू चिकणे हेच खेड नगरपरिषदेचे नवे उपनगराध्यक्ष बनणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेची एकहाती सत्ता आणि संघटनातील एकजूट यामुळे खेडच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरूवात झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg