loader
Breaking News
Breaking News
Foto

पिंपर गावात एकाच दिवशी तीन रस्त्यांचे भूमिपूजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मौजे पिंपर, ता. गुहागर येथे गेल्या सहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. गुहागर तालुक्यात पिंपर गावात एकाच दिवशी तीन रस्त्यांचे भूमिपूजन पार पडले. हा भूमिपूजन सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत भास्कर जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. गेल्या सहा वर्षांत आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नांतून पिंपर गावात धरण गळती दुरुस्ती, कालवा दुरुस्ती, विविध अंतर्गत रस्ते, पूल, स्मशानभूमी, शाळा इमारत, सोलार दिवे व सभागृह अशी अनेक विकासकामे झाली असून सुमारे ४ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर व खर्च करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये पिंपर धरण गळती दुरुस्ती – रुपये ४० लाख, पिंपर धरण कालवा दुरुस्ती –रुपये २ कोटी ७५ लाख, पिंपर सोमजाई मंदिर रस्ता –रुपये ५ लाख, शंकर मंदिर रस्ता –रुपये ७ लाख, पिंपर वरचीवाडी रस्ता – रुपये १३ लाख, पिंपर सहानवाडी पूल – रुपये ६२ लाख, पिंपर मराठा स्मशानभूमी – रुपये ४ लाख, बौद्धवाडी सोलार दिवे, पिंपर शाळा क्र. १ इमारत, पिंपर सोमजाई मंदिर उर्वरित रस्ता दुरुस्ती – रुपये ७ लाख (मंजूर), पिंपर बोंडवाडी रस्ता दुरुस्ती – रुपये ८ लाख (मंजूर), पिंपर मठवाडी रस्ता – रुपये ८ लाख (मंजूर), पिंपर विरवाडी सभागृह – रुपये ३ लाख (मंजूर) करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे पिंपर गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

या दरम्यान सरपंच अनिल घाणेकर, विनायक मुळे, विलास गुरव, जिल्हा परिषद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार सिद्धी रामगडे, युवासेना अधिकारी सचिन जाधव, उपतालुका प्रमुख अंकुश शिगवण, विभागप्रमुख प्रवीण वेल्हाळ, उपविभागप्रमुख निखिल मोरे, शाखाप्रमुख योगेश मोरे, जामसुतचे सरपंच शैलेश साळवी, वेळणेश्वरचे सतीश मोरे, जेष्ठ शिवसैनिक प्रकाश मोरे, विजय दवंडे, संजय दवंडे, राजेंद्र भोसले, विलास काजारे, दिनेश काजारे, संतोष घर्वे, यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg