loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली शहर विकास आघाडीकडून उपनगराध्यक्ष पदासाठी सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्यावतीने नगरसेवक सुशांत नाईक यांचे नाव निश्चित करण्यात आले असून उपनगराध्यक्ष निवडीसाठी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना गटनेते राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर यांना व्हिप बजावला आहे. उपनगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुशांत श्रीधर नाईक यांना मतदान करण्यासंदर्भात व्हिप बजावण्यात आलेला आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीच्यावतीने नगरसेवकांकडुन खबरदारी घेण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाची निवड १३ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानुसार शहर विकास आघाडीच्यावतीने गटनेते गटनेते रुपेश नार्वेकर यांनी सर्व नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुशांत नाईक असल्याने त्यांना मतदान करावे, तसेच १३ जानेवारी २०२६ रोजी पहील्या सर्वसाधारण सभेस न चुकता सकाळी ११ वाजता नगरपंचायत भालचंद्र महाराज सभागृहात उपस्थित रहावे. अन्यथा महाराष्ट स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ कलम ३ अन्वये पक्षादेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अनर्हता होण्याच्या कारवाईस पात्र राहाल. म्हणुन लेखी व्हिप बजावण्यात आला आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष संदेश पारकर, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, वैष्णवी सरमळकर (दिपीका जाधव) आदी नगरसेवकांना व्हिप बजावण्यात आला आहे. त्यामुळे शहरविकास आघाडीच्यावतीने उपनगराध्यक्ष निवडीसाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पक्षीय बलाबलानुसार भाजप पक्षाचे ९ नगरसेवक आहेत. बहुमत तसे पाहता भाजपकडे आहे. तर शहर विकास आघाडीकडे नगराध्यक्ष अधिक ८ नगरसेवक असल्याने समसमान मतदान उपनगराध्यक्ष निवडीत होण्याची शक्यता आहे. जर शहर विकास आघाडीचा एखादा नगरसेवक उपनुपस्थित किंवा विरोधात मतदान करेल या दृष्टीने गटनेत्यांकडुन व्हिप बजावण्यात आलेला आहे. त्यापलिकडे शहरविकास आघाडीच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी कुटुंबियांसमवेत हलविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या उपनगराध्यक्ष निवडीत कुठलाही धोका किंवा दगाफटका होवु नये, यासाठी शहरविकास आघाडीच्या नेत्यांना आवश्यक ती खबरदारी बाळगली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg