loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय चित्रकला परीक्षेत दादासाहेब सरफरे विद्यालयाचा देदीप्यमान ठसा

संगमेश्वर(बुरंबी) - बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय व बुरंबी पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालयाने राज्यस्तरीय शासकीय चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे याही वर्षी विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा अभिमानाने कायम राखली आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी सहभागी झालेल्या १२ पैकी सर्वच १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ५ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, ४ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड तर ३ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत सहभागी झालेल्या ६ विद्यार्थ्यांपैकी सर्व ६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेडसह यश संपादन करत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, कला विषयावरील आवड आणि शिस्तबद्ध सराव महत्त्वाचा ठरला. शासकीय रेखाकला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कला विभाग प्रमुख प्रदीप शिवगण यांनी दिलेले मौलिक मार्गदर्शन, काटेकोर तयारी आणि प्रेरणादायी शिकवण ही यशाची मुख्य गुरुकिल्ली ठरली. या उज्ज्वल यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष प्रताप देसाई व विक्रांत जाधव, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव, संचालक सचिन मोहिते, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

कला व क्रीडा क्षेत्रात जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणारे दादासाहेब सरफरे विद्यालय सर्वांगीण विकासाचा आदर्श घालून देत आहे. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी दाखवलेले विशेष नैपुण्य खरोखरच गौरवास्पद असून या यशाबद्दल दशक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांकडून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg