loader
Breaking News
Breaking News
Foto

वेंगुर्ले नगर वाचनालयाचा वार्षिक पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वाचनाची आवड निर्माण झाली की ज्ञानाची वृद्धी होते. वाचनामुळेच भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपण आपली स्वतंत्र व निर्भीड मते मांडू शकतो. आजच्या काळात सामाजिक आणि राजकीय अधःपतन होत असताना वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले. नगर वाचनालय वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना प्राचार्य डॉ. गोस्वामी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पुरस्कार विजेते: श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार: अभिमन्यू लोंढे (दैनिक रत्नागिरी टाइम्स), सुशीला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार: डॉ. जी. ए. बुवा (सावंतवाडी) टाककर शेट्ये ट्रस्ट पुणे पुरस्कृत साहित्य पुरस्कार: श्रीमती कल्पना बांदेकर (सावंतवाडी) स्व. विष्णूपंत गणेश नाईक आदर्श ग्रंथालय पुरस्कार: श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा अध्यक्ष बाबाजी भिसे स्व. श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार: आनंद देवळी (मळगाव), स्व लक्ष्मीकांत सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार: स्नेहा नारिंगणेकर (शिरोडा) स्व.कृष्णा न्हानू आसोलकर स्मृती बालसाहित्य पुरस्कार: महेश पांडुरंग काणेकर (कणकवली) यांना प्रदान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

वेंगुर्ले नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, पाठांतर आणि चित्रकला स्पर्धांमधील सुमारे ८७ विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज.बा. अरोस्कर, श्रीकृष्ण सौदागर स्मृती, अ.ना. शणई स्मृती,म.शा. भांडारकर, आणि भालचंद्र कर्पे स्मृती स्पर्धांसह विविध स्मृती प्रित्यर्थ ठेवण्यात आलेल्या पुरस्कारांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg