loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आयोजित आणि श्रीम.रजनी ठाकूर (आचरा ), कै.सुधाकर आचरेकर (आचरा ), श्रीम.भावना मुणगेकर (मुंबई ), श्री. प्रसाद रेडकर (मुंबई ), श्रीम.मिथिला नेरुरकर (पुणे) प्रायोजित १८ वर्षावरील व्यक्तींसाठी खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु. १०००, द्वितीय क्रमांक रु. ७००, तृतीय क्रमांक रु. ५००, उत्तेजनार्थ २ बक्षिसे - प्रत्येकी रु. २५०/- अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. कविता स्वरचित मराठी किंवा मालवणी बोली भाषेतील असावी. कविता दीर्घ नसावी. सादरीकरण अवधी ३ ते ५ मिनिटे असेल. कवितेमध्ये राजकीय विडंबन व अश्लीलता असू नये. एका स्पर्धकाला एकच कविता वाचता येईल. स्पर्धकांनी आपल्या कविता दि. २० फेब्रुवारी पर्यंत सकाळी १० ते २ वाजेपर्यंत संस्थेत जमा करायच्या आहेत. प्रथम येणाऱ्या फक्त १५ स्पर्धकांना प्रवेश. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल सौ.विनिता कांबळी ०२३६५-२४६०१७ किंवा ९४२१२६३३४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg