loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. महाविद्यालयामध्ये कॅम्पस क्रिएटिव्ह बाजारचे आयोजन

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच कॅम्पस क्रिएटिव्ह बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायिक कलागुण विकसित व्हावेत आणि बाजारपेठ, ग्राहकांची आवड निवड या विषयांची जाणीव व्हावी या हेतूने आय.सी.एस. महाविद्यालय उद्योजक विकास आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय कॅम्पस क्रिएटिव्ह बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना, क्रियाशीलता यास चालना देत स्वतः तयार केलेल्या वस्तू, उत्पादने यांचे प्रदर्शन व विक्री केली. जवळपास 40 स्टॉलची मांडणी या बाजारामध्ये करण्यात आली होती. वाणिज्य शाखेच्या 65 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले यांनी या बाजाराचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या भेटवस्तू, फ्लॉवर पॉट, सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्यपदार्थ आणि विविध हस्तकलेच्या वस्तू यांचे प्रदर्शन पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचे कौतुक केले, या प्रदर्शना अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी कच्च्या मालाची खरेदी, उत्पादनाची आकर्षक निर्मिती आणि ग्राहकांची आवड तसेच सूचना इत्यादी बाबीची सविस्तर माहिती मिळाली.

टाइम्स स्पेशल

महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करताना, अशा उपक्रमात क्रियाशीलतेला अधिक वाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले. उत्कृष्ट कलाकृती व पदार्थ यांना प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. ए. एम. शेख, डॉ. आर. एस. भालेराव व डॉ. राजेश राजम यांनी केले. सदर उपक्रम वाणिज्य विभागाचे प्रमुख आणि करियर कट्ट्याचे समन्वयक डॉ. सी.आर.साळुंखे,प्रा. केळकर तसेच प्रा. अस्मा पांगारकर, प्रा.अस्मा सुर्वे, प्रा.लीना चिखले व प्रा.सुप्रिया काडगे यांनी विशेष पुढाकार घेऊन पार पाडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg