loader
Breaking News
Breaking News
Foto

इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय दापोली च्या विद्यार्थ्यांची दैदिप्यवान कामगिरी

दापोली - जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2025 - 2026 दिनांक 12 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 रोजी विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट क्रीडा संकुल डेरवण तालुका चिपळूण येथे दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयाचे 14 विद्यार्थी सहभागी झाले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 12 सुवर्णपदक (गोल्ड), 5 रजत पदक (सिल्वर) आणि 4 कांस्यपदक (ब्रांझ) मिळाले. तसेच कर्णबधिर प्रवर्गातील 4 * 100 रिले स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून प्रथम क्रमांकाचा चषक मिळवला. तसेच मुलींच्या गटात 4* 100 रिले स्पर्धेमध्ये मुलींनी प्रथम क्रमांक मिळवून चषक पटकावला. विद्यार्थ्यांनी एकूण 21 पदकं मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभिमान वाटावा अशी कामगिरी सर्व विद्यार्थ्यांनी दाखविली आहे. बारा सुवर्णपदक, पाच रजतपदके, चार कांस्य पदके आणि 400 मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या यशामागे संस्थेच्या अध्यक्षा सुर्वै, मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर सर व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या कामगिरीबद्दल संस्था व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदानाचा वर्षाव होतोय.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg