loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधे झेपावणार.. तेजस, मिराज, राफेल व सुखोई

लायन्स क्लब ऑफ खेड व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था, खेड यांच्या वतीने येत्या 23 जानेवारी 2026 शुक्रवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत पाटीदार भवन शेजारील मैदानातून चक्क झेपावणार आहेत. भारतीय वायू सेनेची मिराज-2000, तेजस, राफेल व सुखोई-30 ही चार RC फायटर्स.. ती करून दाखवणार आहेत.. व्हर्टीकल टेक-ऑफ, आकाशाचा वेध घेताना गिरक्या मारत केला जाणारा व्हर्टीकल चॅर्ली, स्ट्रेट रोल, एका पाठोपाठ एक केले जाणारे रायफल रोल, उलटे ईनव्हर्टेड फ्लाईंग, जास्तीत जास्त उंची गाठून जमिनीकडे गरगरत काळजाचा ठोका चुकवणारा स्पिन, क्षणार्धात नागाप्रमाणे फणा काढणारा कोब्रा.. या अतिशय रोमहर्षक व थरारक कसरती..!! त्याही केवळ 50 ते 200 फुटात.. अगदी तुमच्या डोळ्यासमोर.. इतकेच नाही तर याशिवाय आपण पाहणार आहोत... हवेमधे संथ व दिमाखदार उडणारा ईगल, नाचणारा मासा, उडती तबकडी, बॅनरसह रंगीबिरंगी पताकांचा हवेत वर्षाव करणारे सेस्ना विमान अशा विविध नाविन्यपूर्ण विमानांची आकर्षक प्रात्याक्षिके.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा शो पहाता पहाता .. तुमच्या मनातील विमानाविषयीचे कुतूहल सहज जागृत होऊन.. समजणार आहे सहज सोप्या शब्दात.. विमानातील विज्ञान... मग आपल्यालाही वाटेल असे एखादे विमान बनवून आपण उडवावे उंच आकाशात.. पण या एरोमॉडेलिंग छंदाची सुरुवात करावी कशी.. ते ही माहिती करून दिले जाणार आहे.. नुसतीच माहिती नाही.. तर स्वतः प्रयोग करून विमाने बनवू ईच्छिणाऱ्या जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून दिले जाईल केवळ 500 रु.त तीन उडणाऱ्या विमानांचा संच (मर्यादित संख्येसाठी). या शोच्या माध्यमातून.. आपण प्रगट करणार आहोत.. भारतीय वायू सेनेविषयीची कृतज्ञता व राष्ट्रप्रेम..!!

टाइम्स स्पेशल

लायन्स क्लब ऑफ खेड व शिवचैतन्य पतसंस्थेचे अरविंद भिकूशेठ तोडकरी व महेंद्र मोरेश्वर शिरगांवकर यांनी खेड भागातील विद्यार्थी व पालकांनी या आगळ्या-वेगळ्या शो ला भरभरून प्रतिसाद देऊन या शो चा भरघोस आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. शक्य आहे हा शो पहाणारा खेड भागातील जिज्ञासू विद्यार्थी उद्याचा भारतीय वायुसेनेतील इंजिनिअर अथवा पायलट असेल..!!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg