loader
Breaking News
Breaking News
Foto

खांबाळे, दारिये रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर

वैभववाडी (प्रतिनिधी) - ग्रा.मा. ११७ ते खांबाळे दारिये ग्रा.मा. १५९ हा अंतर्गत रस्ता पूर्णतः जीर्ण झाल्याने नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी १५ लाख रुपयांचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन खांबाळे गावच्या सरपंच प्राजक्ता कदम यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ त्रस्त झाले होते. ग्रामस्थांच्या मागणीला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप रावराणे व भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दिलीप रावराणे यांनी या रस्त्याच्या कामाबाबत थेट पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला. त्यामुळे खांबाळे, गेळये व दारिये परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर झाली असून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भूमिपूजन कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच मंगेश गुरव, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, माजी उपसरपंच गणेश पवार, बूथ प्रमुख महेश चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, बांधकाम शाखा अभियंता बाबर, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, माजी सरपंच विठोबा सुतार, माजी चेअरमन दीपक चव्हाण, माजी उपसरपंच उमेश पवार, ज्ञानेश्वर पवार, दिनेश पालकर, जयसिंग पवार, बाळा गुरव, जयेश पवार, बापू मधुकर पवार, बाबाजी देसाई, रमेश पवार, प्रकाश शेळके, मंगेश सुद, मंगेश कांबळे, अंबाजी पवार, सदानंद महादेव पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून, शैक्षणिक, कृषी व दैनंदिन दळणवळणास गती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg