loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू

वेळणेश्वर : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण अंतर्गत परांजपे मोतीवाले हायस्कूल आणि श्री. आनंदराव पवार कॉलेज, चिपळूण यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात सुरू झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी, राष्ट्रीय कबड्डीपटू तसेच माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव उर्फ बाळा कदम यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी बोलताना बाळा कदम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. अभ्यासासोबतच खेळातही प्राविण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यात खेळाडूंना शासकीय व खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ व माजी अध्यक्ष कै. बापूसाहेब खेडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, डॉजबॉल आदी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध खेळांमध्ये राज्यस्तरावर सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी क्रीडाज्योत आणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गेल्या दोन वर्षांत श्रीराम एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीचे सुमारे सतरा खेळाडू खो-खोच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले असून, त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर यांनी संस्थेच्या क्रीडाविषयक वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली.

टाइम्स स्पेशल

या उद्घाटन समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष राजन खेडेकर, सचिव मलेश लकेश्री, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, संचालक सुहास चव्हाण, विलास चिपळूणकर, राजू विखारे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg