loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात राजमाता मॉ साहेब जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता मॉ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील पालशेत येथील अनिरुद्ध भावे हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता मॉ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष खोत व अनिरुद्ध भावे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अनिरुद्ध भावे यांनी आपल्या व्याख्यानातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत त्याचबरोबर राजमाता मॉ साहेब जिजाऊ यांनी आपल्या शिवाजी महाराजांना घडविताना दिलेल्या शिकवणीचे महत्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देत सांगितले. तसेच भारताच्या दैदिप्यमान अशा संशोधनाचे व इतिहासाची माहिती विविध उदाहरणे देऊन कथीत केली. सदर कार्यक्रमाला 35 विद्यार्थी व 75 विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती लावली.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी महाविद्यालय प्राचार्य प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक डॉ.सुभाष खोत सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, कॉमर्स विभागाचे प्रा. सुभाष घडशी, प्रा. सौम्य चौघुले, प्रा. कांचन कदम इ. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रवीण सनये यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.जालिंदर जाधव यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg