loader
Breaking News
Breaking News
Foto

​सिंधुदुर्गातील रिक्षांची वयोमर्यादा २० वर्षे करा; कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षांची वयोमर्यादा १५ वर्षे निश्चित करण्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाला रिक्षा चालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांचे निकष सिंधुदुर्गसारख्या पर्यटन जिल्ह्याला लावू नयेत, अशी मागणी करत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांना निवेदन देण्यात आले. ​प्रमुख मागण्या आणि हरकती. ​वयोमर्यादेत वाढ करावी अशी मागणी केली. रिक्षांची वयोमर्यादा १५ वर्षांऐवजी २० वर्षे करण्यात यावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. सिंधुदुर्ग जिल्हा हा 'पर्यटन जिल्हा' असला तरी येथील नगरपालिका आणि नगरपंचायती 'ब' व 'क' वर्गातील आहेत. येथे महानगरांसारखी गर्दी किंवा रिक्षांची संख्या नाही. जिल्ह्यात केवळ गणपती उत्सव आणि मे महिन्याच्या सुट्टीतच चांगला व्यवसाय होतो. उर्वरित काळात रिक्षा चालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण जाते. परतीच्या प्रवासात अनेकदा भाडे मिळत नाही. जिल्ह्यातील रिक्षा चालक आपली वाहने अतिशय जपून वापरतात. १५-२० वर्षे झाली तरी रिक्षा सुस्थितीत असतात आणि नियमित पासिंग प्रक्रियेतून जात असतात. त्यामुळे त्यांना 'धोकादायक' म्हणणे चुकीचे आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

​"जिल्ह्यातील रिक्षा चालक शेती आणि बागायती सांभाळून हा व्यवसाय करतात. आरटीओने हा निर्णय घेताना रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे होते. सद्यस्थितीतील जाचक नियमामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे, त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी." अशी मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने निवेदन देऊन केली आहे. ​यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, जॉन्सन रोड्रिक्स यांसह अन्य पदाधिकारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg