loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण येथील माघी गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील माघी गणेश मंदिरात सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे मंदिराचा दहावा वर्धापन दिन व वार्षिक माघी गणेश जयंती उत्सव दि. २१ ते २६ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानिमित्त बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. उदक शांती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वा. मालवण बाजारपेठ मार्गे श्रींचे आगमन, रात्री ९ वा. सातेरी भजन मंडळ, कांदळगाव (बुवा-राजन कोदे) यांचे भजन होईल. गुरुवार दि. २२ रोजी सकाळी ८ वा. गणेशमूर्ती पूजा, ११ वा. अथर्वशीर्ष पठण, सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत सहस्र मोदकांचा नैवेद्य, सायंकाळी ७.३० वा. श्रींची आरती, रात्री ८ वा. बलभीम भजन मंडळ, सर्जेकोट (बुवा-रोहित आडकर) यांचे भजन, ९.३० वा. रेकॉर्ड डान्स. शुक्रवार, २३ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत हळदीकुंकू, ७.३० वा. श्रींची आरती, रात्री ८ वा. श्री भूतनाथ भजन मंडळ, वायरी (बुवा-भालचंद्र केळुसकर) यांचे भजन, ९.३० वा. रेकॉर्ड डान्स. शनिवार, २४ रोजी सायंकाळी ६ वा. श्री समर्थ समईनृत्य (खुडी, जुवीवाडी, देवगड), ७ वा. श्रींची आरती, रात्री ८.३० वा. वेताळ प्रासादिक भजन मंडळ, पोईप (बुवा-ओमकार येरम) यांचे भजन, ९.३० वा. दोन अंकी विनोदी नाटक 'सध्या ह्या शिक्षणाची गरज हा...' सादर होणार आहे.

टाइम्स स्पेशल

रविवार दि. २५ रोजी दुपारी १ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७.३० वा. श्रींची आरती, रात्री ८.३० वा. घुमडाई भजन मंडळ, घुमडे (बुवा-नाना सामंत) यांचे भजन, ९.३० वा. विनोदी नाटक 'लग्नाची वरात-कोणाच्या घरात' सादर होईल. सोमवार, २६ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्रींची सवाद्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg