loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणबी समाज म्हसळा तळवडे विभागतर्फे आरोग्य धन संपदा, रक्तदान शिबीर संपन्न

म्हसळा - तालुका कुणबी समाज तळवडे विभागाने रविवार दि.१८ जानेवारी २०२६ रोजी तळवडे विभागीय युवक मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण हॉल, बोरिवली येथे विभागीय अध्यक्ष राकेश पेंढारी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन घेण्यात आले होते. तळवडे विभागातील १० गावातून जवळपास १२० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या कार्यक्रमाला यशस्वी केले आहे. यासाठी युवक मंडळानी घेतलेली मेहनत सोबत विभागीय कमिटी, क्रीडा समिती आणी महिला मंडळानी छान सहकार्य केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान ह्या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजोपयोगी कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपले रक्तदान हे कोणाला तरी जीवनदान देऊ शकते ह्याच महत्वकांशी वाक्याला आपल्या सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभला. तालुका कुणबी समाज यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे विभाग यांच्या नियोजनात विभाग कमिटी अध्यक्ष राकेश पेंढारी सचिव सतिश पाटील, खजिनदार दिनेश शिगवण, क्रीडा समिती अध्यक्ष प्रफुल धाडवे, सचिव योगेश पागड, खजिनदार अमित पिचुर्ले, महिला मंडळ अध्यक्षा करुणाताई काप, सचिव अनिषा डिंगणकर, खजिनदार सोनाली शिर्के, युवक मंडल अध्यक्ष विश्वास गायकर, उपाध्यक्ष चेतन चव्हाण, उपाध्यक्ष अजित पाखड, सचिव ओंकार धाडवे, सहसचिव अरुण उंडरे, पंकज तांबिडकर, खजिनदार किरण पवार सह खजिनदार निलेश कदम, कल्पेश लाड, हिशोब तपासणी अमित शिगवण व यांच्या सर्व सहकार्यांने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी तालुका सचिव राजू धाडवे, संघाचे खजिनदार महेश शिर्के, तालुका उपाध्यक्ष अनिल बांद्रे, युवक अध्यक्ष रुपेश भोगळ, कल्पेश जाधव महिला अध्यक्षा स्नेहा खापरे, दर्पना कासरुंग, तालुका खजिनदार प्रविण भोगळ क्रीडा अध्यक्ष विजय बोर्ले, माजी कृषी सभापती बबन मनवे, युवक सचिव उमेश पोटले, मनोज काप तसेच बोरीवली ब्लड सेंटर दोशी मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सर्व डॉक्टर सहकारी अलका सुर्वे यांनी सहकार्य केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg