loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील बोरघरच्या मनिषा बुटाला पूणे महानगरपालिकेत विजयी, बोरघर ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील बोरघर गावचे प्रतिष्ठीत व्यापारी संदेश बुटाला यांच्या भावजय मनिषा संदीप बुटाला या पूणे महानगरपालिकेत विजयी झाल्या आहेत. त्या पूणे महानगरपालिकेत प्रभाग 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर प्रवर्ग क (सर्वसाधारण महिला) मधून भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात होत्या. मनिषा बुटाला यांचे पती संदीप बुटाला हे नामांकित डॉक्टर असून व्यवसायानिमित्त पूण्यात स्थाईक झाले आहेत. संदीप बुटाला हे बोरघरचे माजी सरपंच कै. जगन्नाथ बुटाला यांचे पूत्र आहेत. तसेच संदिप बुटाला हे भाजपाचे कोथरुड विभागाचे शहर अध्यक्ष असून भाजपा नेते चंद्रकांत दादांचे खंदे समर्थक आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनिषा बुटाला या भारतीय जनता पक्षाचे कोथरुड मध्य मंडळ, महिला मोर्चाच्या सरचिटणीस असून 2017 च्या पूणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रभाग 11-क मध्ये केवल 1067 मतांनी पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या वैशाली मराठे या निवडून आल्या होत्या. सन 2026 च्या निवडणूकीत पक्ष नेतृत्वाने त्यांना उमेदवारीची पुन्हा संधी दिली व त्या संधीचा फायदा घेत मनिषा बुटाला यांनी विजय खेचून आणला. यावेळी त्यांच्या समोर राष्ट्रवादी (अ.प.), मनसे, काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे उमेदवार होते. परंतु, त्यांची खरी लढत राष्ट्रवादी (अ.प.) पक्षाच्या कांता नवनाथ खिलारे यांचेसोबतच झाली.

टाईम्स स्पेशल

त्यात मनिषा बुटाला यांनी 1286 मतांनी विजय मिळवला. बोरघर गावची सूनबाई पूण्याच्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याने बोरघर ग्रामस्थांनी जल्लोष केला असून बोरघर गावच्या सरपंच ज्योती बोरकर, उपसरपंच भालचंद्र बोरकर, माजी सरपंच उदय बोरकर, बोरघर गावचे मंडळाचे अध्यक्ष किशोर बोरकर, पोलीस पाटील प्रफुल्ल गोवळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मोहिद्दीन माखजनकर, गणपत पडयाळ, महेंद्र पवार, प्रकाश पवार, विलास चव्हाण, अरूणकुमार मोरे, प्रदीप पवार, अनिल पार्टे, विनोद गोवळकर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg