loader
Breaking News
Breaking News
Foto

भक्तीचा मळा फुलला! चौकुळ येथे श्री देवी सातेरी-भावई सप्ताह दर्शन सोहळा उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य चौकुळ गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी-भावईचा वार्षिक सप्ताह उत्सव मोठ्या भक्तीभावात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद आणि देवीच्या नयनरम्य सजावटीने संपूर्ण चौकुळ परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीची केलेली हुबेहूब सजावट. कोल्हापूर येथील पुरोहितांकडून देवीची विशेष सजावट आणि वस्त्रालंकार करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सातेरी देवीचे हे रूप पाहून आमची सातेरी देवी कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी (महालक्ष्मी) दिसत आहे. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाविकांच्या मुखातून उमटत होत्या. सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश शिवाजी गावडे यांच्यावतीने दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांचे स्वागत आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, सुप्रिया गावडे, दिनेश गावडे आणि शिवाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

उत्सवाचे नियोजन आणि सजावटीसाठी दिनेश गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. याबद्दल बोलताना अनेक ग्रामस्थांनी सांगितले की, नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे गुण असलेल्या व्यक्तीच असे भव्य दिव्य आयोजन करू शकतात. केवळ पैसा असून चालत नाही, तर तो खर्च करण्याची दानत लागते, जी दिनेश गावडे यांनी दाखवून दिली आहे. या सोहळ्यात सुमारे ४००० हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावातील कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg