loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून शिक्षक समिती समाज घडविण्याचे कार्य करीत आहे : जयेंद्र रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) - "न्यायाची चाड व अन्यायाची चीड' या ब्रीदवाक्यास बांधिल राहून, "त्याग व सेवा" अंगिकारून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातत्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी पक्षपाती राहून कार्यरत आहे. विद्यार्थी हिताचे असे अनेक उपक्रम राबवून शिक्षक समिती समाज घडविण्याचे कार्य करीत आहे, असे प्रतिपादन जि.प. सिंधुदुर्गचे माजी वित्त व बांधकाम सभापती, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले. शिक्षक समितीच्या वैभववाडी शाखेने यापूर्वी रक्तदान शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक व वस्तुरूप मदत, शैक्षणिक समृद्धीसाठीचे उपक्रम घेऊन हा वारसा कायम ठेवल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा शाखेच्यावतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुक्यांतील एकूण १४४ परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय या परीक्षा केंद्रावर उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर कोल्हापूर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष पुंडलिक पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक वडर, संस्थेचे संचालक शरद नारकर, शिक्षक नेते सुनील चव्हाण, संजय शेळके, शिक्षक समितीचे जिल्हा प्रवक्ते सुधीर गोसावी, शिक्षक समितीचे वैभववाडी तालुकाध्यक्ष विवेकानंद कडू, तालुका सचिव प्रफुल्ल जाधव, महिलाध्यक्षा दिव्या भोसले, महिला जिल्हा संघटक सोनाली सरवणकर, आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्गच्या सौजन्याने इयत्ता - पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, केंद्रशाळा खांबाळे नं. १ व भुईबावडा हायस्कूल या तीन परीक्षा केंद्रांवर संपन्न झाली. या केंद्रांवर केंद्रसंचालक म्हणून पंढरीनाथ सावंत, संतोष मोरे व विलास पाष्टे यांनी काम पाहिले. तिन्ही केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून शिक्षक समितीच्या सदस्य शिक्षक- शिक्षिका यांनी काम पाहिले. केंद्रशाळा खांबाळे, रफीक बोबडे, महादेव शेट्ये यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वैभववाडी शिक्षक समितीचे पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg