loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली नं.1 शाळेच्या स्वरांगी कांबळे ची इस्त्रो भेटीसाठी निवड

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा चाफवली नं.1ची विद्यार्थिनी स्वरांगी परेश कांबळे ई . 6 वी .हिची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे पूर्ण प्राथमिक शाळा चाफवली नंबर 1 चे इस्रो नासा दौऱ्यासाठी सतत तीन वर्ष विद्यार्थी निवड होत असल्याने हॅट्रिक साधली आहे. जिल्हा परिषद, रत्नागिरी प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याद्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इस्रो /नासा निवड चाचणी परीक्षेत सलग तीन वर्ष इस्रो नासा निवड दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांची निवड यशस्वी करून चाफवली शाळेने या परीक्षेत सलग तीन वर्ष विद्यार्थ्यांना इस्रो /नासा परीक्षेचे यश मिळवून यशाची हॅट्ट्रिक साधली आहे. पहिल्यावेळी नितीन बोडेकर, इस्रो दौरा, दुसऱ्या वेळी समीक्षा बोडेकर इस्रो/नासा दौरा आणि आत्ता तिसऱ्या वेळी स्वरांगी परेश कांबळे इस्रो दौरा, अशी ही इस्रो/नासा दौऱ्याची सलग हॅटट्रिक शाळा चाफवली नं. 1 ने पूर्ण करून एक भीम पराक्रमच केला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, शिक्षक स्तर, ग्रामस्थ स्तर यातून शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन 2025/2026 या वर्षातील इस्रो/ नासा निवड चाचणीमध्ये स्वरांगी परेश कांबळे इ. सहावी या विद्यार्थिनींने केंद्रस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर या तिन्हीही स्तरांवर गुणवत्ता यादी प्राप्त करून इस्रो/नासा चाळणी परीक्षेत गुणवत्ता यादी प्राप्त करून शाळा चाफवली नं.1 ला सलगची हॅट्ट्रिक मिळवून देण्यामध्ये मोठे दैदीप्यमान यश मिळवून दिले आहे. त्यामुळे तिचे शिक्षण विभाग, शिक्षक, ग्रामस्थ या वर्गातून अत्यंत कौतुक होत आहे. तिला यश प्राप्त करून देण्यामध्ये शाळा चाफवली नं.1 चे मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक गजानन मोघे तिच्या वर्गशिक्षिका व मार्गदर्शिका संगीता मगदूम, तसेच शाळेतील शिक्षण सेविका नीलम सोलापूरे, वर्षाराणी कदम यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. तसेच मुलाखतीसाठी येणाऱ्या प्रयोगांसाठीचे व मुलाखत प्रश्नांसाठीचे विशेष मार्गदर्शन देवळे हायस्कूलचे मार्गदर्शक शिक्षक विनोद सरदेसाई यांचे देखील मार्गदर्शन लाभले आहे. तसेच देवळे हायस्कूल अध्यक्ष निलेश कोळवणकर व सदस्य व मुख्याध्यापिका सुप्रिया गार्डी व शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शनासाठी शाळेतून प्रयोग शाळा व मुलाखतसाठी मार्गदर्शक शिक्षक उपलब्ध करून दिल्याबाबत त्यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.

टाइम्स स्पेशल

स्वरांगी हिच्या दैदिप्यमान यशाबद्दल देवळे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, केंद्रप्रमुख माननीय संतोष बोडेकर, माजी जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती विलास चाळके, चाफवली सरपंच आरोही रावण, पत्रकार प्रकाश चाळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, पालक, तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक रमेश शिंदे, हिमाली शिंदे व माजी शिक्षक वृंद या सर्वांनी स्वरांगीचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, शाळेतील अन्य शिक्षक, पालक या सर्वांचे अत्यंत मनःपूर्वक कौतुक करून शाळेच्या या इस्रो/नासा हॅट्ट्रिक यशाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. केंद्र देवळे शिक्षक वृंदातून सुद्धा स्वरांगी व शाळा चाफवली नं.1 शिक्षक वृंदांचे कौतुक करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg