loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकळवाड-सावंतवाडी ते राऊळवाडी रस्ते गटार कामाचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) - ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा भाग म्हणून सुकळवाड-सावंतवाडी ते राऊळवाडी एसटी स्टँडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगतच्या गटार बांधकामाचे उद्घाटन आज माजी सरपंच युवराज गरुड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी परिसरातील विकासकामांना गती देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी माजी सभापती अजिंक्य पाताडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पाताडे, सेवानिवृत्त माजी ग्रामसेवक राऊत, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, ग्रामपंचायत ऑपरेटर रूपाली बिलये यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे व सुभाष म्हसकर यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.

टाइम्स स्पेशल

या उद्घाटन सोहळ्याला पाताडे वाडीतील ग्रामस्थ पंढरी पाताडे, पंकज पाताडे, बाजारपेठ येथील ग्रामस्थ सिद्धेश पावसकर यांच्यासह राऊळवाडी-सावंतवाडीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यात होणारी पाण्याचा निचरा करण्याची समस्या या नव्या गटार बांधकामामुळे मार्गी लागणार असल्याने उपस्थित ग्रामस्थांनी या मंजूर कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg