loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याणमध्ये 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणीचीआत्महत्या, प्रियकराच्या छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

ठाणे : कल्याण पूर्व परिसरात एका 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. नेहा असे या मृत तरुणीचे नाव आहे. प्रियकराकडून छळ, मारहाण आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपयांच्या पिळवणुकीला कंटाळून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले. आरोपीवर गुन्हा दाखल होऊनही त्याला अटक नसल्याने संताप व्यक्त होत आहे. संतप्त कुटुंबीय आणि महिलांनी थेट पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ घातला. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कल्याण पूर्वेमधील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणीने 28 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने फसवणूक केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबियांनी कल्याण कोळसवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र असूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. कौशिक प्रकाश पावशे असे आरोपीचे नाव आहे.मृत तरुणी नेहा हिची हैदराबादला बदली झाली होती. आरोपीने तिथे जाऊनही तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे. तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते. तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. तरुणीचा मोबाईल तपासल्यानंतर काही मेसेजमध्ये कौशिकने दिला पैशासाठी त्रास दिल्याचे उघडकीस आले आहे.

टाइम्स स्पेशल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा आणि आरोपी कौशिक पावशे गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्याने नेहाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर, तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg