loader
Breaking News
Breaking News
Foto

‘स्मृतिगंध’ मैफलीतून रसिक झाले मंत्रमुग्ध रोहनराज, मारुतीराव कीर यांना आदरांजली

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र कै. मारुतीराव कीर आणि त्यांचे नातू रोहनराज सावंत यांच्या स्मृतिनिमित्त ‘कलाप्रेमी’ प्रस्तुत ’स्मृतिगंध’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. दिग्गज संगीतकार एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांच्या गाण्यांना ज्यांनी आपल्या लयीने सजवले, अशा भाईंनी र्‍हिदम दिलेल्या निवडक मराठी व हिंदी गीतांचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी या मैफलीमध्ये सेलिब्रिटी कलाकार म्हणून शैलजा सुब्रमण्यम, कोमल कृष्णा, रवींद्र शिंदे आणि चिराग पांचाळ सहभागी झाले होते. त्याच्या सुरावटीने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध झाले. त्यांना सचिन सावंत, ब्रिजेश शहा, सुमित सरफरे, सागर साठे, किरण गायकवाड, विनोद देवरे, हिमकर कांबळे, साईराज शिखरे आणि भीमसेन कोठाळ यांनी साथसंगत केली. विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध र्‍हिदम कलाकार अनुपम घटक आणि रत्नागिरीचे सुपुत्र विजय शिवलकर यांनी आपली कला सादर केली. उद्योजक दिनकर (दिनू) सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg