loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये एरोमॉडेलिंगचे रोमहर्षक प्रात्यक्षिक

खेड (दिलीप देवळेकर) खेड शहरात आज एक वेगळाच आणि अत्यंत रोचक उपक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने एरोमॉडेलिंगचे डेमो प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. येत्या तेवीस जानेवारी रोजी होणाऱ्या हवाई दलाच्या विमानाच्या प्रतिकृतीच्या प्रात्यक्षिकाचा हा डेमो शो पाटीदार भवन पाठीमागील मैदानात घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एरोमोडेलिंग हा छंद साधा नसून दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झालेला एक विज्ञाननिष्ठ उपक्रम आहे. विमानांविषयी आकर्षण असणाऱ्या मुलांना या छंदातून हवाई विज्ञानाची मूलभूत संकल्पना समजते. विमान कसे उडते… दिशा कशी नियंत्रित करायची… आणि लँडिंग कसे करायचे… या सर्व गोष्टींची माहिती शोदरम्यान ध्वनिक्षेपकावरून थेट मुलांना दिली जाते. त्यामुळे त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते आणि विज्ञान विषयावरील रुची अधिक वाढते. तज्ज्ञ सदानंद काळे यांनी सांगितले की एरोमोडेलिंगच्या माध्यमातून मुलांना एव्हिएशन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि विमानशास्त्राचा पाया समजण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. अनेक मुले या छंदातून पुढे जाऊन एरोस्पेस इंजिनिअरिंग, पायलट ट्रेनिंग किंवा हवाई दलाची कारकीर्द निवडतात. आज झालेल्या प्रात्यक्षिकास लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे पदाधिकारी, शिवचैतन्य नगरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी आणि तालुका शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांनीही उपस्थित राहून या अनोख्या शोचा अनुभव घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश… मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांच्या मनात हवाई विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणे आणि करिअरच्या नवीन संधींची दारे उघडणे हा आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg