loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉंग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांचा राजीनामा

राजापूर (वार्ताहर)- राजापूर तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या आपल्या राजीनामा पत्रात जितेंद्र खामकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पक्ष सदस्यत्व आणि तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर तालुक्यात मधल्या काळात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जितेंद्र खामकर यांनी पक्ष संघटन वाढीसाठी मोठे काम केले होते. त्याची दखल घेऊन त्यांची कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. नगरपरिषदेत सत्ता देखील महाविकास आघाडीची आली होती. त्यामुळे आघाडीत उत्साहाचे वातावरण होते. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमाला सुरवात होत असतानाच कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या सदस्य आणि तालुकाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकिची रणधुमाळी सुरु झाली असतानाच कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेससह महाविकास आघाडीला दणका मिळाला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg