loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवा शहरातील कोकणी व पश्चिम महाराष्ट्रातील रहीवास्यांची साथ विकास कामांना

दिवा : दिव्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील दिवा शहरातील रहिवासी व ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील राहणारे कोकणवासी रहिवासी यांचे दोन्हीही वेगवेगळे मेळावे दिवा शहरातील अवधूत हॉलमध्ये मोठ्या संख्येच्या उपस्थित पार पडले. परिणामी सदर भागातील दिवा शहरात वास्तव्यास असलेले दिवेकर रहिवासी रविवारची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या दहा पंधरा वर्षातील दिवा शहराचा झालेला कायापालट, पूर्वी व आत्ताचा दिवा, याचे सर्वस्व श्रेय देण्यासाठी मोठ्या संख्येची उपस्थिती दिसून आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर दोन्हीही मेळाव्यात दिव्याची साथ विकास कामांना थोडक्यात धनुष्यबाणाला अश्या पद्धतीने घोषणा देत शिंदेच्या शिवसेनेला रहिवास्यांनी आपला पाठिंबा दर्शवीला. प्रसंगी उपरोक्त जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व सभासद अवधूत हॉलमध्ये मोठ्या संख्येने व उत्साहात सहभागी झाले होते. सदर मेळाव्यात दिव्याची साथ विकास कामांना थोडक्यात धनुष्यबाणाला अश्या पद्धतीने घोषणा देत शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला. प्रसंगी उपरोक्त जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख व उमेदवार रमाकांत मढवी तसेच उमेदवार दीपक जाधव, दर्शना म्हात्रे व साक्षी मढवी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत व अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

प्रसंगी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लोकांशी माझी जोडलेली नाळ व जुन्या आठवनींना उजाळा देत सदर रहिवस्यांनी केलेल्या कामे व मागणीवर सकारात्मकता दाखवत शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी रहिवास्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

प. महाराष्ट्र व कोकणी रहिवास्यांचे मेळावे संपन्न

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg