loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुक्यातील जि.प आणि पंचायत समितीसाठी जागा वाटप फायनल

रत्नगिरी ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल आहे. रत्नागिरी तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी याबाबत आढावा घेतला. महायुतीत तालुक्यातील १० गटात शिवसेनेचे उमेदवार देण्यात येणार असून, भाजपला केवळ पंचायत समितीचे दोन गण देण्यात येणार असल्याचे जवळपास ्‌‘फायनल’ झाल्याचे वृत्त समजते. जिल्हा परिषद निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यात यावेळीही भाजपाच्या वाट्याला एकही जागा येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीतही भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती आणि यंदाही परिस्थिती तशीच राहणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंचायत समितीमध्ये मात्र भाजपाला दोन जागा देण्यावर युतीत निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांना आता स्वीकृत सदस्यपदावरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी पंचायत समितीत भाजपासाठी हरचिरी आणि वाटद गण सोडण्याची तयारी शिवसेनेने दर्शविल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत भाजपाच्या इच्छुकांना स्वीकृत सदस्यपद देण्याबाबतही सहमती दर्शवण्यात आल्याचे समजते. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधानापेक्षा नाराजीचे वातावरण अधिक आहे. तालुक्यातील मिरजोळे गटात गावडे, करबुडे गटात बाबू म्हाप, नाचणेत प्रकाश रसाळ, कर्ला महेंद्र झापडेकर, पावस ऍड. महेंद्र मांडवकर, शिरगावमध्ये मोरे, गोळपमध्ये नंदा मुरकर यांचे नाव निश्चति झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील कोतवडे, वाटद, हातखंबा गटात जागावाटपाचा पेच कायम आहे. येथे अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुकांनी आपल्यातला एकजण निश्चित करावा, अन्यथा मी सांगेन त्याचे नाव निश्चित करून सर्वांनी त्याला समर्थन द्यावे असेही ना. सामंत यांनी सांगितल्याचे समजते. यावेळी राजू महाडिक व शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg