loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवा प्रभाग क्र २७, २८ व २९ च्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती

दिवा :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा येथील प्रभाग क्रमांक २९ चे शिवसेना - भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील, अर्चना पाटील आणि वेदिका पाटील यांच्या प्रचारार्थ दिवा, पडले गाव व दोस्ती वसाहत येथे जाहीर सभा पार पडल्या. यावेळी प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. विशेषतः माता भगिनींची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती. दिवा शहरात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत असून मेट्रोचे जाळे निर्माण झाले असून मेट्रो - १२ आणि मेट्रो -१४ मुळे दैनंदिन प्रवासाचा वेळ कमी होणार असून, दिवा -शीळ मार्गाच्या काँक्रीटीकरणामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात घटला आहे. रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळत असून, दिवा आता आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुलेट ट्रेनचे प्रगतीपथावर असलेले स्थानक हे दिव्यासाठी मैलाचा दगड ठरणार असून, शहराला थेट राष्ट्रीय स्तरावरील दळणवळणाशी जोडणारे ठरेल. खिडकाळी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करून धार्मिक वारशाला नवे स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे आणि भुयारी गटारी योजनांमुळे स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाय होत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. सामाजिक सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीतही दिवा पुढे जात आहे. नव्या सामाजिक सभागृहांमुळे सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळत असून, शाळा, पोलिस यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि पर्यावरणपूरक निर्णयांमुळे नियोजित आणि संतुलित शहरनिर्मितीकडे दिवा वेगाने वाटचाल करत आहे.

टाइम्स स्पेशल

भविष्यात ही शिवसेना महायुतीच्या माध्यमातून दिवा शहराच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी प्रकल्प राबविण्यात येतील असे मत यावेळी व्यक्त केले. यासाठी तुमची सर्वांची साथ महत्त्वाची आहे. यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह इतर प्रभागातील सर्व अधिकृत उमेदवार, स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg