loader
Breaking News
Breaking News
Foto

अश्वमेध तुळस महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न; सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी ( प्रतिनिधी) - वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'अश्वमेध तुळस महोत्सव २०२६' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात सक्रीय सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान वेदिका परब यांनी स्थानिक नागरिकांशी आणि महिलांशी सविस्तर सुसंवाद साधला. सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची तळमळ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची असलेली जाण यावेळी प्रकर्षाने दिसून आली. महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती आणि समाजकार्य यांची सांगड घातल्याबद्दल त्यांनी वेताळ प्रतिष्ठानचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने उद्योजक दादासाहेब परुळेकर आणि बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, उद्योजक पुष्कराज कोल्हे, दयानंद कुबल, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, भाजप तालुका महिला अध्यक्ष सुजाता पडवळ, सामाजिक कार्यकर्ते निलेश नागवेकर यांच्यासह वेताळ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

तुळस गावच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना आणि उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. भाजप आणि वेदिका परब यांच्या जनसंपर्कामुळे या महोत्सवाला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg