loader
Breaking News
Breaking News
Foto

माडखोल येथे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. सैनिक हे आपल्या देशाचे खरे नायक आहेत. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत. हे शिवछत्रपती सैनिक भवन केवळ एक इमारत नसून, सैनिकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला माडखोल परिसरातील नागरिक, माजी सैनिक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. "सैनिक हा देशाचा कणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारातून तयार झालेला आपला तरुण आज सीमेवर देशाचे रक्षण करत आहे. माडखोल येथे उभारण्यात आलेले हे सैनिक भवन केवळ एक इमारत नसून, ती सैनिकांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. या भवनाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल."

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, उपसरपंच जीजी राऊळ, अध्यक्ष मसाजी राऊळ, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव उमेश कारिवडेकर सचिव, सहदेव राऊळ, मायकल डिसोझा, पांडुरंग सावंत, स्वप्नील राऊळ, चंद्रकांत शिरसाट, लक्ष्मण गवळी, संजय राऊळ, संजय लाड, रवी राऊळ, संतोष बिले, केतन आजगावकर, दिपक गावकर, भाजपचे चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg