loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महापालिकेत 25 वर्षानंतर सत्तापालट.. सर्वात श्रीमंत महापालिकेच्या चाव्या भाजपाकडे, ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई. देशातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा किंग कोण होणार याची सर्वांना उत्सुकता सर्वांना लागली होती. मुंबईच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढत होती. मराठी माणूस, हिंदू महापौर, मराठी महापौर, मुंबईचे अदानीकरण आदि मुद्दे मुंबईच्या प्रचारात केंद्रस्थानी होते. मात्र भाजपने ठाकरे बंधूंना कडवी झुंज देत विजय खेचून आणला आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. भाजपने मुंबईत शंभरी पार केली असून मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागत 25 वर्षानंतर सत्तांतर झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आघाडीने 100 जागांवर आघाडी घेतली असून त्यांची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये भाजप 80 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 20 जागांवर आघाडीवर आहे. मुबईत दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरलेल्या ठाकरे गटाने ६० जांगावर विजय मिळवला आहे. मनसे मतदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरली असून त्यांचे उमेदवार केवळ 9 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) 1 जागेवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंतची समोर आलेली आकडेवारी - भाजप- 88 ,शिवसेना- 21 , शिवसेना UBT : 58

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg