loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वर्गीय गोविंदरावजी निकम जयंती निमित्त न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - लोकनेते, स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती निमित्त गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय समितीचे जेष्ठ सदस्य सागर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते, स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी विशेष स्तवनगीत व स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक मोरे यांनी करताना शाळेच्या विविध गरजांची माहिती तसेच शाळेचा यशाचा चढता आलेख सादर केला. त्यानंतर विद्यालयाला मदत करणाऱ्या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनोगत व्यक्त करताना उपसरपंच विलास घाणेकर यांनी लोकनेते, स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी अध्यक्षीय भाषणात सागर ठाकूर यांनी लोकनेते, स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांनी त्यावेळी वेळणेश्वर पंचक्रोशी मध्ये विद्यालय सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिल्याबद्दल गौरवोदगार काढले. यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच लोकनेते, स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेत सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर शिक्षकांच्या कामकाजाबाबत शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, नाट्य व गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

टाइम्स स्पेशल

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विलास घाणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संदेश ठाकूर, पोलीस पाटील साईप्रसाद ठाकूर, वेळणेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सुरेश गोवळकर, यादवराव - प्रतिष्ठानचे सुरेंद्र घाग, डॉ. अक्षय शिरगावकर, आय झेड कोकणातील चॅनलचे राष्ट्रीय विजेते व कोकणी विनोदी कलाकार मकरंद वैद्य, शालेय समिती सदस्य यशवंत मते, रवींद्र पोळेकर, संदीप गावणंग, अमोल जामसुतकर, चैतन्य धोपावकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष श्वेता धोपवकर, गुरव, इतापे, मोरे, रहाटे, वर्षा गुरव, नाटेकर, प्राथमिक शाळा नं.१ चे बाबासाहेब राशिनकर, साळे आदि. मान्यवर व वेळणेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, आजी-माजी विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg