loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणाला १, तर कुणाला ५ नव्हे तब्बल १५ कोटींची ऑफर, सगळा पैशांचा खेळ मांडलाय; राज ठाकरे कडाडले

ठाणे : कुणाला १ कोटी, तर कुणाला ५, १०, नव्हे तर तब्बल १५ कोटी रुपयांची ऑफर सत्तारूढ भाजपाने दिल्यामुळेच इतिहासात प्रथमच एक, दोन नव्हे तर तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. पैशाचे खुलेआमपणे वाटप सुरू आहे, असा आरोप करत अरे, विचार करा... किती विकले जाल? आपल्या मुलाबाळांना काय सांगाल? माझा बाप, माझी आई विकली गेली म्हणून माझ्या नशिबी हे असे राज्यकर्ते आले. याचा तरी विचार करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांना केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचाराच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. त्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ठाणे शहरात संयुक्त सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. ’कुणाला १ कोटी, कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, कुणाला १५ कोटींची ऑफर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिली गेली’, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली. उद्या प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरांत पैसे वाटायला सुरुवात होईल. आधी देखील पैसे वाटायला सुरुवात झाली. भाजपाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेच्या सेनेचे लोक ते पैसे पकडत आहेत. म्हणजे या सरकारमध्ये काय चालू आहे? हेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण-डोंबिवलीत गेलो, काही मतदारसंघात फिरलो, प्रचंड हवा आहे तिकडे, खरे तर कल्याण-डोंबिवलीमधील काही लोकांना या ठिकाणी बोलवणार होतो. पण प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आज घरांघरात पाच-पाच हजार रुपये वाटत आहेत. मला हे समजत नाही की मग तुम्ही काय विकास केला? कल्याण-डोंबिवलीमध्ये गुलामांचा बाजार मांडलाय. पैसे वाटून अनेकांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. एका प्रभागातील एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर दिली गेली होती. १५ कोटींची ऑफर त्या कुटुंबातील तीन जणांनी नाकारली. दुसर्‍या एका महिला उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी ५ कोटींची ऑफर दिली गेली होती.

टाइम्स स्पेशल

आणखी एका उमेदवाराला १ कोटींची ऑफर दिली गेली होती. म्हणजे कुणाला १ कोटी, कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, कुणाला १५ कोटींची ऑफर दिली गेली, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी राज ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी. देवेंद्र फडणवीस हे सगळे तुम्ही कुणासाठी करताय? पण काल मी म्हटले ना की हे फक्त ससाणे आहेत, जाऊन फक्त पक्षीच मारून आणायचे आहेत यांना. मी त्या गौतम अदाणीचं प्रकरण काढले, काय मिरच्या झोंबल्या. पुढे काय सुरू केले? माझा आणि गौतम अदाणींचा फोटो, माझ्या घरी गौतम अदाणी येऊन गेलेत, रतन टाटा येऊन गेले आहेत, मुकेश अंबानी येऊन गेले आहेत, चित्रपटातले कलाकारही येऊन गेले आहेत. मग? माझ्या घरी येऊन गेले म्हणून याची पापं झाकायची का मी?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. गौतम अदाणी घरी आले होते काहीतरी दोन ते तीन वर्षांपूर्वी आले होते. आता घरी आले होते तर काय करु? हाकलून देऊ? शिवाय अदाणीशी दोस्ती करण्याइतका अडाणी मी नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटले, आमचं गुजराती लोकांशी, समाजाशी भांडण नाही. जे काही डाव रचत आहेत त्या विरोधात इथल्या गुजराती समाजाने बोलल पाहिजे’, असं राज ठाकरेंनी म्हटले आहे. नवी मुंबईचा विमानतळ सोडले तर अदाणीने एकही विमानतळ बांधलेले नाही. जी विमानतळं घेतली आहेत ती सगळी गन पॉईंटवर चालवायला घेतली आहेत. पोर्टचंही तेच, गुजरातमथले मुद्रा पोर्ट बांधले आहे. इतर पोर्ट गन पॉईंटवर चालवायला घेतली आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg