loader
Breaking News
Breaking News
Foto

आंगवली करकोटवाडीतील युवक मार्लेश्वर मंदिरात गेली 23 वर्ष करतात महाप्रसादाचे वाटप

देवळे (प्रकाश चाळके) - अंगवली येथील श्री देव मार्लेश्वर मंदिरात अनेक वेगवेगळी मंडळे काही ना काही सेवा करत असतात. मग ती स्थानिक मंडळे असोत वा बाहेरिल मंडळी असोत. देवाची सेवा घडावी हाच एक उद्देश असतो. कोणी फटाक्यांची आतषबाजी तर कोणी रांगोळी तर काहीजण शंखनाद अशा सेवा करत असतात. त्यात आंगवली करकोटवाडी येथील युवक गेली 23 वर्ष महाप्रसादाचे वाटप करत असून ही सेवा अविरत चालू आहे आणि यापुढेही चालू ठेवण्याचा मानस या युवकांचा आहे. जेणेकरून मार्लेश्वर चरणी आपली सेवा व्हावी या उद्देशाने हे युवक महाप्रसादाचे वाटप करत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली 23 वर्ष करकोटवाडी येथील तरुण विना खंडित महाप्रसादाची सेवा बजावत आहेत. यामध्ये संतोष अणेरराव, विनय अणेराव, राजेंद्र अणेराव, प्रकाश मांडवकर, सुरेश मांडवकर, अरुण मांडवकर, मनोहर शिंदे, अजित पवार, गौरव पवार, साहिल अणेराव, अभिषेक अणेराव, साहिल मांडवकर, प्रणील अणेराव, स्वप्निल शिंदे, आर्य अणेराव, बापू चव्हाण, संतोष गुडेकर, अक्षय शिंदे, सम्राट अणेराव, सिद्धेश अणेराव हे युवक उत्स्फूर्तपणे येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करत आहेत, आणि यापुढेही असेच महाप्रसादाचे वाटप दरवर्षी करण्यात येईल असे संतोष अणेराव व सर्व युवकांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

यावर्षी मात्र या महाप्रसादाच्या वाटप करू नये म्हणून काही लोकांनी थोडीफार वादावादी केली. मात्र देवरुख पोलीस यंत्रणेने योग्य वेळी चांगला निर्णय देऊन अन्नदानाच्या कार्याला सहकार्य केले व या युवकांना प्रोत्साहन देऊन महाप्रसादाचे वाटप करण्यास सांगितले. या महाप्रसादाच्या वाटपात कोणाचाही मोठेपणा नव्हता तर गेली 23 वर्षे चाललेली अविरत सेवा पुढेही चालू राहावी, असेच करकोटवाडीतील युवकांचे म्हणणे होते. देवरुख पोलीस यंत्रणेला सहकार्य बद्दल करकोट वाडीतील युवकांनी धन्यवाद दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg