loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर बेलोसे महाविद्यालयात जागतिक भूगोल दिनानिमित्त भूगोल सप्ताह उत्साहात साजरा

दापोली येथील वराडकर बेलोसे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक भूगोल दिनानिमित्त भूगोल विभागाच्या वतीने विविध शैक्षणिक व बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करून भूगोल सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, पर्यावरणीय जाणीव वाढवणे तसेच संशोधनवृत्तीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या भूगोल सप्ताहांतर्गत पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, संशोधन अहवालांचे प्रकाशन तसेच विषयतज्ज्ञांची व्याख्याने अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. बिभीषण ढवळे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड होते. कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. बिभीषण ढवळे यांनी जागतिक भूगोल दिनाचे तसेच भूगोल विषयाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. भूगोल हा केवळ नकाशे, पर्वत किंवा नद्या यांचा अभ्यास नसून मानवी जीवन, नैसर्गिक संसाधने, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्याशी थेट संबंधित विषय असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक काळात भूगोल विषयाचे महत्त्व अधिक वाढले असून स्पर्धा परीक्षा, संशोधन, नियोजन आणि प्रशासनामध्ये भूगोलाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भारत कराड यांनी भूगोल विषयाचे कृषी, पर्यावरण अभ्यास, हवामान संशोधन आणि सामाजिक विकासातील स्थान अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच भूगोल सप्ताहाची संकल्पना व आयोजनाचे महत्त्व भूगोल विभाग प्रमुख डॉ. स्कंधा खेडेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मकर संक्रांत दिनाचे भौगोलिक व शास्त्रीय महत्त्व सांगताना स्पष्ट केले की 21 डिसेंबर पासून उत्तरायण सुरू होते व त्यामुळे सूर्यकिरणांची दिशा बदलते आणि उत्तर गोलार्धात दिवस मोठे होऊ लागतात. ही घटना भारतीय तिथीनुसार संक्रांतीच्या दिवशी सुरू होते.या खगोलशास्त्रीय घटनेचा हवामान, ऋतूचक्र व कृषी व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो. तसेच मकर संक्रांत हा धार्मिक सण असला तरी तो भूगोल व खगोलशास्त्राशी निगडित वैज्ञानिक घटना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ही संकल्पना प्राचीन भारतीय खगोलज्ञानाची साक्ष देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी व्यासपीठावर प्रा. जयश्री गव्हाणे, डॉ. गणेश मांगडे, प्रा. मालदेव कांबळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ती पत्रक प्रथम क्रमांक श्रेया तुरे द्वितीय मनस्वी टेंभे तर निबंध स्पर्धेत प्रथम -श्रेया तुरे द्वितीय ऋतुरानी धाडवे,तृतीय- जुई परचुरे व उत्तेजनार्थ रीतीशा कुरुळकर तसेच संशोधन अहवाल सुहास लवाटे साईराज ढगे, फेमिदा राजपूरकर,पार्थ कदम, रितिकेश यादव,अमृता खैरे,सिद्धार्थ जाधव या विद्यार्थ्यांनी तयार केला. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण भूगोल सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी भूगोल विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी व भूगोल विषयाविषयी रुची निर्माण करणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg