loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस.महाविद्यालयात भव्य ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने नुकतेच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथदिंडीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍड.आनंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच विविध प्रकारचे ग्रंथ पालखीमध्ये ठेवून त्यांचे पूजन करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांनी केले. त्यामधून त्यांनी वाचनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे असा संदेश दिला. ऍड. आनंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करताना, वाचन ही आज काळाची गरज आहे, तसेच आभासी जगात वावरताना पुस्तक हाच खरा आपला मित्र आहे. वाचाल तर वाचाल हा कानमंत्र दिला वाचलात तर आपल्या ज्ञानात भर पडेल. माध्यमांमधून मिळणार्‍या वरवरच्या किंवा अपुर्‍या ज्ञानापेक्षा पुस्तकातील ज्ञान हे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रंथदिंडीसाठी एन.सी.सी. विभागाच्या छात्रांनी सुंदर बँड वाजवून रंगत आणली तसेच या दिंडीत एन.एस.एस. स्वयंसेवकांचा सहभागही लक्षणीय होता. ग्रंथदिंडी समाप्तीनंतर भव्य अशा ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन चेअरमन ऍड. आनंदराव भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विविध विषयांची मौलिक पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. सुंदर सजावट व पुस्तकांची सुबक रचना हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्‌य होते. याप्रसंगी एनसीसीचे डॉ. सचिन सागर, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. साळुंखे एनएसएसचे समन्वयक, प्रा. केळकर, प्रा. मस्के, आय टी विभाग प्रमुख डॉ.सचिन भोसले तसेच महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. डी. एम. शिंदे, इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg