loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजाचे नवनिर्वाचित नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांचा आगळावेगळा उपक्रम

लांजा (संजय साळवी) - लोकप्रतिनिधी हा जनतेचा मालक नसतो तर तो पालक असतो. पालकत्वाच्या नात्याने त्याने जनतेच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. लांजा नगरपंचायतमधील नवनिर्वाचित नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी आपल्या कामातून हेच दाखवून दिले आहे. त्यांनी नुकताच एक आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम असा राबविला आहे. नगरपंचायत हद्दीतील प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी फिरणार्‍या घंटागाडीमधून फिरून त्यांनी जनतेच्या कचर्‍याबाबतच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवनिर्वाचित नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी शहरातून कचरा गोळा करणार्‍या घंटागाडीमधून फिरताना कचरा कशा पद्धतीने गोळा केला जातो, स्वच्छता कर्मचारी नागरिकांना कसे सहकार्य करतात तसेच कचरा टाकताना नागरिकांना कोणत्या अडचणी येतात याची सविस्तर माहिती त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत घेतली. याशिवाय कचरा संकलन प्रक्रियेत नागरिकांना अजून कोणत्या सुविधा देता येतील किंवा त्यांना नगरपंचायतीकडून आणखीन कोणत्या सहकार्याची आवश्यकता आहे याबाबतही नागरिकांची मते जाणून घेतली.

टाइम्स स्पेशल

पंढरीनाथ मायशेट्ये हे लांजा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक २ मधून निवडून आले असले तरी केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता त्यांनी इतर काही प्रभागांमधून फिरत नागरिकांशी चर्चा केली. सकाळी आठ वाजल्यापासून त्यांनी घंटागाडीसोबत फिरण्यास सुरुवात करत कचरा संकलनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी नागरिकांना घंटागाडीत कचरा टाकण्यास मदत देखील केली. त्यांच्या या या उपक्रमामुळे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून लोकप्रतिनिधी थेट मैदानात उतरून नागरिकांच्या समस्या समजून घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी केवळ कार्यालयात बसून नव्हे तर प्रत्यक्ष कामात सहभागी होवून जनतेच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात याचे हे एक उत्तम उदाहरण नवनिर्वाचित नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी आपल्या कामातून घालून दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg