loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी डंपर चोरी प्रकरण: सोलापूरच्या दुसर्‍या संशयीतास पुण्यातून अटक; २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - मार्च २०२४ मध्ये मळगाव येथून झालेल्या डंपर चोरीच्या तपासाला आता गती मिळाली आहे. या प्रकरणातील फरार असलेला दुसरा संशयीत धनाजी नागनाथ लोकरे (वय ३५, रा. लवुळ, ता. माढा, जि. सोलापूर) याला सावंतवाडी पोलिसांनी पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सालईवाडा-सावंतवाडी येथील रहिवासी अभिषेक सावंत यांचा डंपर मार्च २०२४ मध्ये मळगाव येथून चोरीला गेला होता. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना २०२५ मध्ये पोलिसांनी सुनील कोळेकर नावाच्या संशयीतास सर्वप्रथम अटक केली होती. सुनील कोळेकरच्या चौकशीतून या चोरीत सोलापूर परिसरातील आणखी तीन संशयीतांचा समावेश असल्याचे समोर आले होते. मात्र, हे तिन्ही संशयीत तेव्हापासून फरार होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते.

टाइम्स स्पेशल

१६ जानेवारी रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील आणि हवालदार रामदास जाधव यांनी मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथे सापळा रचला आणि संशयीत धनाजी लोकरे याला ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या धनाजी लोकरेला आज सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या चोरीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे आणि उर्वरित संशयीत कोठे आहेत, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg