loader
Breaking News
Breaking News
Foto

​नेमळे धनगरवाडीतील असंख्य ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​नेमळे धनगरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर आणि विचारांवर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या विशेष पुढाकारातून हा पक्षप्रवेश झाला असून, धनगरवाडीतील ग्रामस्थांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे म्हणाले की, "राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या वाड्यांच्या विकासासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढेही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असाच भरघोस निधी दिला जाईल आणि धनगरवाडीचा सर्वांगीण विकास नक्कीच साधला जाईल." ​या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विलास गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख गौरव मुळीक, गेळे सरपंच सागर ढोकरे, तसेच नेमळे गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg