loader
Breaking News
Breaking News
Foto

निष्ठावंत विरुद्ध बाईमान अशी लढाई आहे - संजय राऊत

ठाणे (अमोल पवार) - एक मोदी सबसे भारी, एकनाथ शिंदे शेकडो सभा घेतात यांना राज आणि उद्धव ठाकरे हे सौ सोनार की दो लोहार की असा टोला उद्धव ठाकरेशिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदेंना लगावला. निष्ठावंत विरुद्ध बाईमान अशी लढाई आहे. कालच्या मुंबईच्या सभेमुळे मिंधे आणि फडणवीस सावरले नाही. आजच्या सभेचे अध्यक्षपदाच स्थान भाजपच्या मंत्रिमंडळातील देवेंद्र फडणवीस सरकारचे मंत्री गणेश नाईक यांना द्यायला पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश नाईक म्हणतात मला परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचे घोडे फरार नाही बेपत्ता करील. नाईक यांना आव्हान आहे भ्रष्टाचार उघड करायची परवानगी लागत नाही. तुम्ही नवी मुंबईमध्ये टांगा पलटी करा आम्ही ठाण्यात टांगा पलटी करतो अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर केली. सोमवारी ठाकरे बंधूंच्या दोन्ही सभेत राऊत यांनी टीका केली.

टाइम्स स्पेशल

नवी मुंबईत हारामांचा पैसा वाटला जातो. ठाण्याच्या पालकमंत्र्यांचा वस्त्रहरण भाजपचा मंत्री करतो ठाणेकरं मुंबईकराना पाहता येणार नाही. अजित पवार म्हणतात भाजपा हा राक्षस आहे. भाजपची राक्षसीवृत्ती बघवत नाही. भाजपचा माज उतरवायला पाहिजे. जगणं झालं छान कारण धनुष्य बान असं नाही जगणं झालं छान कारण तुम्ही आमचा चोरला धनुष्य बान असा हल्लाबोल राऊत यांनी भाजपा - शिंदेंवर केला. बेईमान आणि गद्दाराना स्थान नाही अमित शहा आणि मिंधे टिकणार नाहीत असे देखील राऊत म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg