loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना-भाजपा युतीने लढणार

कणकवली (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्ही लढविणार आहोत. भाजप व शिवसेना जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होईल. 50 जिल्हा परिषद व 100 पंचायत समिती जागांवर युतीचा विजय निश्चित आहे. असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते खास. नारायण राणे यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर पालिका निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युतीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला जाईल असा इशाराही खा. नारायण राणे यांनी दिला आहे. कणकवली येथे भाजप व शिवसेना युतीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आ. अजित गोगटे, शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आंग्रे, महिला आघाडी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला अध्यक्षा श्वेता कोरगांवकर, काका कुडाळकर, संदीप कुडतरकर आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खा. नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह सर्व आठही पंचायत समित्यांच्या निवडणुका आम्ही युतीच्या माध्यमातून लढणार आहोत. या अनुषंगाने दिवसभर भाजप - शिवसेना महायुती नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समित्यांच्या १०० जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर होणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासात भाजप आणि शिवसेनेचे मोठे योगदान आहे. विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. विरोधकांना या निवडणुकीत मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. लोकांच्या संपर्कात आणि वेळेला धावणारा भाजप – शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण पूर्तता करण्यात आली असून, चिपी विमानतळाची विमानसेवा आता पूर्णपणे सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीतपणे कार्यरत असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले असून या विकासात विरोधकांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेनेलाच आहे, असा ठाम दावा खासदार नारायण राणे यांनी केला.त्यामुळे सर्व जागांवर आमचा विजय होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.

टाइम्स स्पेशल

राज्यात नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा मुंबईसह अन्य पालिकांमध्ये धुव्वा उडवून युतीने जो विजय मिळवला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचे अभिनंदन करतो, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, महायुतीची निवडणूकविषयक बैठक पार पडली असून जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg