loader
Breaking News
Breaking News
Foto

राजीवली शिर्केवाडी येथील ९५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह नदीपात्रात

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील कडवई नदीपात्रात एका वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाहू तुकाराम शिर्के असे वृद्धाचे नाव आहे. याबाबत संजय बारकू ओकटे (वय ५०, व्यवसाय शेती, पोलीस पाटील, रा. तुरळ हरेकरवाडी) यांनी खबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोरील कडवई नदीपात्रात एक पुरुष जातीचे प्रेत उताण्या स्थितीत, कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर मृतदेहाची ओळख नापत्ता रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ मधील नोंद असलेल्या शाहू तुकाराम शिर्के (वय ९५, धर्म हिंदू मराठा, रा. राजीवली शिर्केवाडी, ता. संगमेश्वर) यांच्याशी जुळत असल्याची खात्री त्यांच्या मुलाने घटनास्थळी येऊन मृतदेहावरील यष्टी व कपड्यांच्या आधारे केली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आमृ. रजि. नं. ०३/२०२६ बी.एन.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून सदर आकस्मिक मृत्यूचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी, देवरूख यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी (अंतर्गत माखजन दूरक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg