loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका नाभिक समाज संघटनेच्या सलून दरात २६ जानेवारी पासून २० टक्के दरवाढ

खेड : खेड तालुका नाभिक समाज संघटनेच्यावतीने सलून सेवांच्या दरात येत्या २६ जानेवारी २०२६ पासून २० टक्के दरवाढ लागू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अमर दळवी यांनी दिली आहे. या दरवाढीबाबतचा ठराव १२ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. २०२२ सालानंतर वाढलेली महागाई, साहित्याचे वाढलेले दर, वीज, पाणी व इतर खर्च लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे अध्यक्ष अमर दळवी यांनी माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केलेल्या दरवाढीस ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खेड तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचबरोबर सलून व्यावसायिकांनी देखील ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य करावे असे देखील समाजबांधवना सभेप्रसंगी सूचित करण्यात आले. सदर सभेप्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष दिपक माने, श्यामसुंदर दळवी, सचिव नितीन साळुंखे, समीर पवार, तसेच कार्यकारिणी सदस्य नागेश दळवी, किरण जाधव, शरद चव्हाण, संतोष मोहिते आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg