loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने, युद्धाचे ढग गडद

जगावर अमेरिकेचे वर्चस्व टिकवून ठेवण्यात अमेरिकेचे यूएसएस अब्राहम लिंकन हे जहाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे असून ही युद्धनौका समुद्रावर तरंगणारे एक मोठे शहर आहे. महाकाय युद्धनौका इराणच्या दिशेने निघाले असल्याने युद्धाचे ढग गडद झाले असून इराणचे धाबे दणाणले आहेत. या युद्धनौकेवर ६० ते ७० लढाऊ विमाने असून १०० पेक्षा अधिक लढाऊ विमाने या युद्धनौकेवर उतरु शकतात. हे जहाज दोन न्यूक्लिअर रिऍक्टर्सवर चालते. त्यामुळे याला इंधन भरण्यासाठी वारंवार बंदरात येण्याची गरज भासत नाही. २५ वर्षे समुद्रात हे जहाज असेच राहू शकते. यासोबतच क्षेपणास्त्र, पाणबुड्या यांचा ताफाही सोबत असतो. संपूर्ण युनिट कोणत्याही देशाच्या नौदलाचा सामना करण्यास सज्ज आहे. अमेरिका इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच भारताने देखील इराणमधून मायदेशात परत येण्याच्या सूचना तेथे राहणार्‍या भारतीय नागरिकांना केल्या आहेत. अमेरिकेची युद्धनौका अत्यंत विनाशकारी युद्ध छेडू शकते पण तुर्त तरी अशी शक्यता फार कमी आहे. युद्धाचे ढग मात्र इराणसाठी गडद झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg