loader
Breaking News
Breaking News
Foto

गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोपालक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

मालवण : (प्रतिनिधी) - गो-आधारित उद्योग, पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या उद्देशाने गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत येत्या शनिवार दि. १७ जानेवारी रोजी सरसोली धाम येथे 'गोपालक प्रशिक्षण वर्गाचे' आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्ग सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. या प्रशिक्षण वर्गामध्ये गो-पालनासोबतच गो-विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान गाईच्या शेणापासून विविध उपयुक्त व पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गात गोकाष्ठ निर्मिती, गोमय पणती तयार करणे तसेच गो-नाईल (गोमूत्र व शेणापासून तयार होणारे नैसर्गिक स्वच्छता द्रावण) या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वस्तू पर्यावरणपूरक असून त्यांचा वापर वाढवून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती शक्य आहे, असे आयोजकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रशिक्षणासाठी गोसेवा गतिविधीचे प्रांतसंयोजक हरिओमजी शर्मा तसेच प्रांत प्रशिक्षण प्रमुख वैभव चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा संयोजक चंद्रशेखर पुनाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्गाचा लाभ गोपालक, शेतकरी, युवक-युवती तसेच महिलांनी घ्यावा, नोंदणीसाठी सौ. उज्वला प्रभू (मो. ९८५०७८२५९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गो-आधारित उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग उपयुक्त ठरणार असून पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg